नागपूरसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये भिक्षेकऱ्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढतोय... आणि धक्कादायक म्हणजे, या साखळीत निष्पाप लहान मुलांचा वापर केला जातोय… लहान मुलं सिग्नलवर भीक मागताना दिसली की आपल्याला दया येते आणि आपण मदतीचा हात पुढे करतो.. मात्र हाच मदतीचा हात त्या चिमुकल्यांचं आयुष्य उध्वस्त करतोय. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी मिशन मुक्ती अंतर्गत मोठी कारवाई केलीय.. पाहुयात नागपुरातील भिक्षेकऱ्यांचं वास्तव दाखवणारा हा विशेष रिपोर्ट.