लग्नकार्य किंवा सरकारी कामासाठी नागरिकांना इकडून तिकडं जाण्यासाठी हक्काचं साधन म्हणजे आपली लालपरी. पण सध्याच्या कडक उन्हामुळं एसटी प्रवास करताना अंगाची अक्षरश: काहिली होतेय. अशावेळी तहानही सतत लागतेय. प्रवाशांची तहान भागवण्यासाठी राज्यातील एसटी स्टॅन्डवर सरकारकडून नाथजलाची सोय करण्यात आलीय. पण याच नाथजलाच्या माध्यमातून ऐन उन्हाळ्यात एसटी प्रवाशांची लूट सुरु असल्याचा प्रकार धाराशिव जिल्ह्यात समोर आलाय... पाहूया एक खास रिपोर्ट