पुण्यातील अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला... पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील काही शाळा अनधिकृत असल्याची यादी जाहीर करत पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी या शाळांना मान्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय, अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्रुटी पूर्तता न करणाऱ्या शाळा चालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.