पायधुनी मृत्यूप्रकरण| कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईटचा अंश,कामा हॉस्पिटलच्या डीनसोबत बातचीत

मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.. या प्रकरणी आत्तापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर आलीय.. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.. चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहेत.. चौघांच्या शरीरात तसेच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील झिंक फॉस्फाईट सापडलंय... 11 दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागलाय... फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार सर्व मृतांकडून घेतलेल्या अंतर्गत अवयवांच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळले आहे.कलिंगडाच्या नमुन्यातही झिंक फॉस्फाइड आढळले आहे.तसेच इतर कोणत्याही खाद्यपदार्थांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळलेले नाहीय.दरम्यान या अहवालाचा सखोल अभ्यास केला जाईलतसेच फॉरेन्सिक डॉक्टरांशी चौकशी करुन पुढील तपास केला जाणार असल्याचं DCP प्रवीण मुंडे म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ