नागपूरच्या सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत दोन पोलिस निरीक्षक आणि सात पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यामागे केवळ पाचशे रुपयांची तक्रार करून एका क्रिकेट बुकीला अडिचशे कोटींच्या घोटाळ्यात अडकविण्याचा प्रकार असल्याचे पुढे आले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना सायबर पोलिसांचे वर्तन पूर्णत: बेकायदेशीर असल्याचं चौकशीत उघड झाले आहे. पाहूयात यासंदर्भातील विशेष वृत्तांत.