छत्तीसगडच्या गरियाबंदमधील नक्षलवादी कारवाईला मोठे यश आलंय. ८ लाख बक्षीस असलेली महिला नक्षलवादी जाणसीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. नक्षलवाद्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत. गरियाबंदमध्ये ८ लाख बक्षीस असलेली महिला नक्षलवादी जाणसी ने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे . नक्षलवादी जाणसी ही महाराष्ट्राची रहिवासी आहे. तिने सांगितले की, तिच्या आत्मसमर्पण केलेल्या साथीदारांचे आनंदी जीवन पाहून ती प्रभावित झाली. त्यानंतर तिने हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला.