नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय. आज तीन मंत्र्यांनी शपथ देण्यात आली. गेल्या आठवड्यात सोमवार मंगळवार आणि बुधवारी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलनं झाली. देशात बोळाकलेला भ्रष्टाचार आणि राजकीय वशिलेबाजीला विरोध करण्यासाठी देशातील जेन झी तरुणांनी रस्त्यांवर उतरुन निषेध केला. संसदेसह मंत्र्यांची घरं पेटवून देण्यात आली. यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन केलं. नेपाळमध्ये तीन दिवस सुरु असलेल्या धुमश्चक्रीत 72 जणांचा बळी गेलाय. लष्करानं सूत्र हाती घेतली आणि आंदोलकांच्या सहमतींनं नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशिला कार्की यांनी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतील. आज त्यांच्या मंत्रीमंडळात कलमन गुरंग, रामेशोर खनाल आणि ओमप्रकाश अरल यांनी शपथ घेतली. गुरुंग हे उर्जा मंत्री म्हणून काम पाहतील, तर रामेशोर खनाल अर्थमंत्री आणि ओम प्रकाश अरल गृहमंत्रीपदाचा भार सांभाळतील. येत्या सहा महिन्यात कार्कीच्या नेतृत्वातील अंतरिम सरकार देशात निवडणूक घेऊन नवी सरकार अस्तित्वात आणेल.