मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने आर्थिक फसवणूक प्रकरणात राज कुंद्राचा जबाब नोंदवलाय... 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसानी राज कुंद्राचा जबाब नोंदवलाय.. मुंबई पोलीस पुढील आठवड्यात पुन्हा राज कुंद्राला समन्स पाठवणार असल्याची माहिती मिळतीय... याआधी राज कुंद्रा यांना 10 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, चौकशीला हजर राहण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत मिळावी, अशी मागणी त्याने केली होती.. ही मागणी मुंबई पोलिसांनी मान्य केली.. त्यानंतर आता राज कुंद्रा चौकशीसाठी हजर झाला होता.. दरम्यान, आता शिल्पा शेट्टीला देखील लवकरच पोलीस चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे..