येत्या काही दिवसात इस्रायल- हमास युद्धाला तीन वर्ष पूर्ण होतील. इस्रायलनं हमासला संपवण्यासाठी ऑक्टोबर 2023मध्ये हे युद्ध सुरु केलं. त्याआधी 7 ऑक्टोबर 2023 ला हमासनं इस्रायलमध्ये एका जत्रेच्या ठिकाणी हल्ला करुन 1200 इस्रायली नागरिकांना ठार केलं. 251 जणांचं अपहरण करुन ओलीस ठेवलं. पण आज तीन वर्षानंतरही 48 जण हमासच्या ताब्यात आहेत. इस्रालयनं मधल्या जवळपास पावणेतीन वर्षात गाझावासियांचं जगणं कठीण करुन ठेवलं. आधी अन्नकोंडी करून उपासमार आणि आता संपूर्ण गाझावर ताबा मिळवण्यासाठी इस्रायली लष्करानं हल्ले सुरु केलेत. त्यामुळे शुक्रवारपासून आधीच जमीनदोस्त झालेल्या गाझा शहरातून लाखो लोक त्यांची घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जाऊ लागलेत. पाहुयात गाझाच्या पलायनाविषयीचा हा खास रिपोर्ट