मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला तरीही महाराष्ट्रात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरूच आहे. मुंबई, पुण्यात जोरदार पाऊस कोसळतोय. मुंबई ठप्प झालीय.. तर पुणेकरही पावसामुळे हैराण झालेत. संभाजीनगर जिल्ह्याला तर पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही दोन दिवसांपासून पाऊस बरसतोय.. एकूण राज्यात पावसाची काय परिस्थिती आहे..पाहुयात या रिपोर्टमधून..