वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा कारनामा आता समोर आलाय. नवी मुंबईतील अपघातानंतर ट्रकच्या क्लिनरचं अपहरण केल्याचा आरोप खेडकर कुटुंबावर झाला. तपासासाठी पोलिस गेल्यावर त्यांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचं कळतंय. आज पुन्हा एकदा पोलीस तपासासाठी गेल्यावर पूजाचे आई-वडील दोघेही फरार असल्याचं स्पष्ट झालंय... त्यामुळे वादग्रस्त खेडकर कुटुंबाचा नवा वाद चांगलाच चर्चेत आलाय... पाहूया एक खास रिपोर्ट.