मराठा समाजानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात विविध समाजाचे मोर्चे निघत आहेत. सरकारच्या हैद्राबाद गॅझेटच्या जीआरनंतर आता बंजारा समाजही त्याच गॅझेटनुसार आरक्षणाची मागणी करतोय. तर दुसरीकडे आदिवासी समाज बंजारा समाजाच्या मागणीविरोधात रस्त्यावर उतरलाय... राज्यातील या जातीय अस्थिरतेवरुन शरद पवारांनी चिंता व्यक्त केलीय. तर फडणवीसांनी पवारांना टोला लगावलाय... राज्यात आरक्षणावरुन नेमकं राजकारण कसं सुरुय, जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट