भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराच्या थांबवेल्या वाटाघाटी आता मंगळवारी सुरु होणार आहेत. अमेरिकेन व्यापार विभागाचे प्रतिनिधी आज रात्री दिल्लीत पोहचणार आहेत. हे प्रतिनिधी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व्यापर करार अंतिम वाटाघाटींसाठी भारतात येणार होते. पण 7 ऑगस्टच्या ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केल्यानं वाटाघाटींना ब्रेक लागला. तेव्हापासून दोन्ही देशातल्या व्यापारीसंबंधंमध्ये वितुष्ट आलं. पण गेल्या दीड महिन्यात ट्रम्प यांची भारताविषयीचा राग हळूहळू कमी झाला आहे. आता पुन्हा एकदा वाटाघाटी सुरु होऊन नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी व्यापार करार होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींची सहावी फेरी असणार आहे. अमेरिकेनं लावलेल्या टेरिफचा सर्वाधिक फटका वस्त्रोद्योग, दागिने उद्योग आणि मत्सव्यवसायातील श्रिंम्पच्या निर्यातीला बसलाय. व्यापार करारात टेरिफ कमी झाल्यानं या सगळ्या क्षेत्रांना फायदा होणार आहे.