चीनचे परराष्ट्र मंत्री Wang Yi भारत दौऱ्यावर, S Jaishankar यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ स्तरीय चर्चा

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी सोमवारी दुपारी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर दाखल झाले. दुपारी चारच्या सुमारास दिल्लीत आल्यावर लगेचच वांग यी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ स्तरीय चर्चा झाली. या बैठकीत प्रामुख्यानं गेल्या सात आठ महिन्यात भारत-चीन यांच्यातील संबधा आणखी दृढ करण्यावर भर देण्यात आला. 2020मध्ये गलावान मध्ये चीन लष्कराच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला. यावेळी दोन्ही देशांमध्ये तेव्हापासून संबंध विकोपाला गेले होते. पण गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्यास सुरुवात केली. एप्रिल आणि मे महिन्यात आधी राजनाथ सिंग मग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल आणि नंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर वांग यी यांचा भारत दौरा होतोय. उद्या वांग यी अजित दोभाल यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भारत आणि चीन यांच्यातील साधारण साडे तीन हजार किलोमीटरच्या सीमेविषयी सखोल चर्चा अपेक्षित आहे.

संबंधित व्हिडीओ