तीन वर्षांपासून रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. हेच युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या आपली सगळी शक्ती पणाला लावतायत. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की आणि डोनाल्ड़ ट्रम्प यांची भेट होतेय.. पंधरा ऑगस्टला ट्रम्प आणि पुतीन यांची भेट झाली. त्याला आता चार दिवस झाले आहेत. या काळात ट्रम्प यांनी झेलेन्स्कींवर युद्ध थांबवण्यासाठीचा दबाव वाढवण्यास सुरुवात केलीय...शिवाय आजच्या बैठकीआधीच ट्रम्प यांनी काही अटीशर्तीही घातल्यात.ट्रम्प-पुतीन यांच्या बैठकीनंतर झेलेन्स्की-ट्रम्प बैठकीत काय घडतंय यावर युद्धविरामाची पुढील वाटचाल अवलंबून आहे. पाहूया एक रिपोर्ट....