युरोपात सध्या भीषण वणव्यांनी अनेक देश होरपळतात. वणव्यांचा सर्वाधिक फटका स्पेनला बसलाय. स्पेनमधील गाल्सिया प्रांतात 12 ठिकाणी वणवे पेटलेत. संपूर्ण देशाचं तापमान 45 अंशावर गेलंय., वणवे विझवण्यासाठी फ्रान्स आणि इटलीतून विमानं बोलावण्यात आली आहेत. अग्निशमन दलाचे जवळपास 2000 जवान आग विझवण्याचा प्रयत्न करतायत.