भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन अध्यक्ष पुतीन यांच्यात सोमवारी फोनवरून महत्त्वाची चर्चा झाली. पुतीन यांनी मोदींना फोन करून ट्रम्प यांच्यासह झालेल्या चर्चेची माहिती दिली. शुक्रवारी अलास्कामध्ये ट्रम्प पुतीन यांची ही भेट झाली होती. ही भेट भारतावरील टॅरिफमुळे शक्य झाल्याचं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलं होतं. तसंच भेटीनंतरही भारतावरील टॅरिफबाबत ट्रम्प यांनी विचार करणार असल्याचं म्हटलं होतं.त्यामुळे पुतीन आणि मोदी यांच्यातील या फोन कॉलला महत्त्व आहे. या फोनकॉलबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून माहिती दिलीय