Chiplun| गोवळकोटमध्ये गणेश विसर्जनाच्या दोन अनोख्या परंपरा; रिंगणात नाचवून,तर बोटीतून बाप्पाला निरोप

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या गोवळकोटमध्ये गणेश विसर्जनाची अनोखी परंपरा आजही जपली जातेय.गावातील सर्व गणपती एकाच वेळी विसर्जनासाठी बाहेर पडतात. नदीकिनारी पोहोचल्यानंतर डोक्यावरून आणलेल्या गणेशमूर्तींचं नदीपात्रात रिंगण केलं जातं... पारंपरिक पद्धतीने नाचवत बाप्पाला निरोप दिला जातो आणि त्यानंतर विसर्जन केलं जातं.तर दुसरीकडे गोवळकोटमधील भोई समाजाचीही आगळी परंपरा आहे. बोटीतून गणपती बाप्पाला नदीच्या खोल पाण्यात नेलं जातं. बोटीतच वाजतगाजत, भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप दिला जातो आणि त्यानंतर विसर्जन केलं जातं. गोवळकोटच्या या दोन पारंपरिक विसर्जन पद्धती सध्या गणेशभक्तांचं विशेष आकर्षण ठरत आहेत. Chiplun news | Two unique Ganesh immersion traditions in Goval-kot: dancing in the arena and bidding farewell to Bappa from a boat.

संबंधित व्हिडीओ