पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या किरकोळ कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. चाकण चौकाजवळील तळेगाव रोड परिसरात दोन गटांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. यावेळी बेकायदेशीर जमाव जमवत शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली तसेच लाथाबुक्क्यांसह लाकडी बॅट आणि स्टंपने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मकसुद खान, हमीद खान, सलामत खान, बिलाल खान आणि जावेद शहा या पाच आरोपींना अटक केली आहे. घटनेप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.