अकोल्यातील कृषी विद्यापीठात अमरावती विभागाच्या पिक परिस्थितीची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत एक अधिकारी वारंवार झोपल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली.. यावर स्पष्टीकरण देताना, फोटो काढताना अधिकाऱ्याचा डोळा लागला असेल, असे म्हणत मंत्र्यांनी बचावात्मक भूमिका घेतली. एकीकडे हिंगोलीत काजू-बदाम खातानाचे व्हिडिओ समोर आले असताना, आता अकोल्यात थेट बैठकीतच अधिकारी डुलक्या घेत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीत शासकीय अधिकारीच बेफिकीर असल्याचे दिसून येत असल्याने, हे सरकार व प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत खरोखरच किती गंभीर आहेत? असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
Akola | Officials doze off during Amravati division's drought review meeting; Agriculture Minister offers a bizarre explanation.