Washim| ST प्रवर्गातून आरक्षणासाठी 7 तरुणांचे उपोषण, पोहरादेवीत संत रामराव यांच्या समाधीसमोर आंदोलन

बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सुरू असलेल्या उपोषणाची आज आठव्या दिवशी सांगता करण्यात आली. विविध जिल्ह्यांतील सात तरुणांनी संत रामराव महाराजांच्या समाधीसमोर हे आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने बंजारा धर्मगुरू तथा विधान परिषदेचे आमदार बाबूसिंग महाराज यांनी मध्यस्थी केली. यावेळी पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करून मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले. उपोषणकर्त्यांनी एसटी आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या समितीने आतापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल जाहीर करण्याची मागणीही केली आहे. Washim news 7 youths hunger strike demanding reservation under the ST category; protest held in front of Sant Ramrao's Samadhi at Pohradevi.

संबंधित व्हिडीओ