मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सवात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी आलेले दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांनी व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत सामान्य भाविकांप्रमाणे रांगेत उभे राहून गणरायाचे दर्शन घेतले. गर्दीची नेमकी परिस्थिती आणि भाविकांचा अनुभव जाणून घेण्यासाठी त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह मुखदर्शन रांगेत सहभाग घेतला. यावेळी केवळ बंदोबस्ताचा आढावा न घेता त्यांनी स्वतःही बाप्पाचे दर्शन घेतले आणि व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबीयांनाही गणरायाचे दर्शन घडवले. त्यांच्या या साधेपणाची आणि संवेदनशीलतेची भाविकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
Police officer shuns VIP culture; Vikram Deshmane joins the queue for darshan of Lalbaugcha Raja.