मराठवाड्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथे भेट देऊन त्यांनी करपलेल्या शेतीची आणि पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे. पिकांच्या पाहणीनंतर रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केलीय..त्याचबरोबर हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी केलीय.. दरम्यान, याच प्रश्नावर येत्या 24 तारखेला बीडमध्ये मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
Demand for ₹50,000 per hectare for farmers; Rohit Pawar calls for a protest in Beed on September 24.