गणेशोत्सवात Pune-Nashik रेल्वेचा देखावा चर्चेत, Pimpri तल्या पेंढारच्या युवकांकडून जनजागृती

उत्तर पुणे जिल्ह्यात पुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत जनभावना अधिक तीव्र होत असताना, गणेशोत्सवाच्या माध्यमातून या मागणीला वेगळ्या पद्धतीने वाचा फोडण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सारंग बाबा नवतरुण मित्र मंडळाने यंदा पुणे-नाशिक रेल्वेचा आकर्षक देखावा साकारला आहे. या देखाव्यामध्ये खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि संगमनेरमार्गे प्रस्तावित रेल्वेमार्ग दाखवण्यात आला असून, परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची दीर्घकालीन मागणी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला देशभरातील बाजारपेठांमध्ये योग्य दर मिळावा, वाहतुकीचा खर्च कमी व्हावा आणि विकासाला चालना मिळावी यासाठी हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरेल, अशी भावना युवकांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या देखाव्याच्या माध्यमातून मांडलेली ही संकल्पना सध्या जुन्नर तालुक्यात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित व्हिडीओ