भंडारा जिल्ह्याच्या चुलबंद खोऱ्यात बुधवार मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चुलबंद नदीला पूर आला आहे.. या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव–मांडळ मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याचे चित्र समोर आले आहे.. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांनी पुलावरून ये-जा करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं.. गेल्या अनेक दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत.