भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, Ambernath चे उपनगराध्यक्ष Sadashiv Patil यांचं विधान

भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण परसेंटेज कमी असायला पाहिजे, असं खळबळजनक वक्तव्य अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलं. अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत डायसवर बसून पाटील यांनी हे वक्तव्य केलं. यामुळे आता सदाशिव पाटील अडचणीत येण्याची चिन्हं आहेत.अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत काही कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण परसेंटेज कमी असायला पाहिजे, असं वक्तव्य केलं.

संबंधित व्हिडीओ