Ram Mandir दानचोरीवर संघाची पहिली प्रतिक्रिया, कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेला मोठा धक्का- होसबळे

अयोध्येतील श्रीरामलल्ला मंदिराच्या दानपेट्यांमधील रकमेच्या कथित चोरी प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हिंदू समाज आणि कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगतानाच, मंदिर व्यवस्थापन आणि संचालनातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाला केले आहे. तसेच हिंदू समाजाने धैर्य आणि संयम राखावा आणि या घटनेचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्म व समाजाला बदनाम करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये, असे आवाहनही दत्तात्रय होसबळे यांनी केले आहे.

संबंधित व्हिडीओ