भीमाशंकर परिसरातील प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं स्पष्टीकरण दिलंय. हा प्रकल्प गुजरातचा नसून महाराष्ट्राचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकल्पातून राज्याला 12 हजार मेगावॅट वीज मिळणार असून 30 हजार कोटींची गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रकल्प सौरऊर्जेवर आधारित असल्याने पर्यावरणाला हानी होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच भीमाशंकर अभयारण्यात वृक्षतोड सुरू नसून मंदिर परिसरात कोणतंही काम प्रस्तावित नसल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं...