Siddhivinayak Temple चं सुशोभीकरण कामाचं CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून यापूर्वी वाद निर्माण झाला होता. प्रारंभीच्या पत्रिकेत महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची नावं नसल्याने चर्चा रंगली होती. त्यानंतर नव्या पत्रिकेत महापौर रितू तावडे यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं, मात्र उपमहापौर संजय घाडी यांचं नाव वगळल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली. मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून राबवला जाणारा हा सुशोभीकरण प्रकल्प भाविकांसाठी सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे

संबंधित व्हिडीओ