स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या 18 जून रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीला रंग चढू लागलाय.घोडेबाजार तेज झालाय. पळवापळवीही सुरू झाली.या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य मतदान करीत असल्याने त्यांचे भाव चांगलेच वाढलेयत.पाच वर्षातून एकदा ही संधी प्राप्त होत असल्याने या संधीचं सोनं करण्याची मानसिकता मतदारांची दिसून येतेय. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे नगरसेवक पर्यटनाला गेले असून नॉट रिचेबल झालेयत.काँग्रेसचे सुमारे 60 ते 70 नगरसेवक पर्यटनाला गेल्याचे सांगितले जातंय.हे सर्व नगरसेवक ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभीड आणि सावली नगरपालिकेचे असल्याचे सांगितले जाते.भाजप पैशांच्या बळावर अशी पळवापळवी करीत असेल आणि आमचे नगरसेवक त्याला बळी पडून बाहेर जात असतील, तर अशा नगरसेवकांवर कठोर कारवाई करू, असा इशारा आता काँग्रेसने दिलाय. तर 1 मताला 10 लाख रुपये असा दर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय