Jalgaon Vidhan Parishad जागेसाठी Shivsena ची बैठक, जळगावची जागा लढवण्यावर स्थानिक नेत्यांचं एकमत

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जळगावात महत्त्वपूर्ण बैठक घेतलीय.. या बैठकीत जळगाव विधान परिषद मतदारसंघाची जागा शिवसेनेनेच लढवावी, असा सूर स्थानिक नेत्यांनी एकमताने मांडला. या बैठकीत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख दिलीप लांडे, मंत्री गुलाबराव पाटील,आमदार किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत झालेला निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवण्यात येणार असून, जळगाव विधान परिषद जागा लढवण्यासंदर्भात जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच मुंबईत जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे. तसेच भाजपला जागा सुटल्यास मैत्रीपूर्ण लढतीची शिवसेनेची तयारी असल्याचेही आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित व्हिडीओ