अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री Marco Rubio यांची सपत्नीक ताजमहलला भेट, बेंचवर बसून दाम्पत्याचं फोटोसेशन

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पत्नी जेनेट रुबियो यांच्यासोबत सोमवारी ताजमहाल पाहिला. दोघांनी डायना बेंचवर बसून फोटो काढले. मार्को रुबियो पत्नी आणि 60 लोकांच्या शिष्टमंडळासह सकाळी 10 वाजता आग्रा येथे पोहोचले. त्यांच्यासह अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोरही होते. यावेळी रुबियोंच्या पत्नी जेनेट यांनी ताजमहल आवडल्याचं सांगितलं. मात्र यावेळी दोघांना उन्हाचाही त्रास होत असल्याचं जाणवलं, ४१ अंश सेल्सिअस तापमानात मार्को रुबियो 45 मिनिटे ताजमहाल परिसरात फिरले.

संबंधित व्हिडीओ