ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचा गोडवा महाग झालाय. येत्या काही दिवसांमध्ये साखरेच्या दरामध्ये दुप्पटीनं वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर शंभरीच्या पार जाण्याची चिन्ह आहेत. दरम्यान देशांतर्गत बाजारात विक्रमी पातळीवर पोहोचलेले साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात बदल केलाय. सुमारे १० लाख टन कच्ची साखर मर्यादित काळासाठी शुल्कमुक्त आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच घाऊक ग्राहकांसाठी साठवणूक मर्यादाही कडक करण्यात आली आहे. दरम्यान साखर दरवाढीचा फार कमी फायदा पश्चिम महाराष्ट्राला होणार असल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केवा आहे.