सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी.राज्यात पुढील चार आठवडे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे...तसंच दुसऱ्या आठवड्यापासून दिवसाच्या तापमानात मोठी वाढ होऊन उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे...ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, पहिल्या आठवड्यात काहीसा दिलासा असला तरी २८ आठवड्यापासून महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे....सध्या अनेक पिके काढणीच्या आणि परिपक्व होण्याच्या टप्प्यात आहेत. अशा वेळी पावसाची ओढ आणि वाढता उकाडा यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.