तुळजाभवानीच्या मंदिरात कुलधर्म, कुलाचार, गोंधळ हे धार्मिक विधी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल होत असतात. त्यातच सुट्टी असल्यानं आज भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामी आणि आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात सध्या भाविकांची रेलचेल पहायला मिळते आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालीये. सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे. आई तुळजाभवानीच दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतायत.