मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत भंडाऱ्यात येतायत. यावेळी जागतिक दर्जाच्या जलपर्यटन केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी कार्यकर्ता संमेलनाला मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. भंडारा शहरातील रेल्वे मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रम स्थळावरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी आपण पाहूयात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन वर्षातून तिसऱ्यांदा भंडाऱ्यात येत आहेत.