मध्य अमेरिकेला चक्रीवादळाने तडाखा दिलाय.केंटकी, मिसूरी राज्यात या चक्रीवादळामुळे 21 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.इलिनॉय आणि इंडियाना राज्यातही प्रचंड नुकसान झालंय. या वादळांमुळे घरांचे नुकसान झाले आहे, वीजवाहिन्या तुटल्या आहेत.आणि मध्यपश्चिम आणि ग्रेट लेक्स प्रदेशात मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे