सरकारने मराठी सक्तीचा निर्णय मागे घेतला.. 15 ऑगस्टपर्यंत कारवाईला मुदत दिली. आता या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालीय.. मनसे आता मुंबईत बॅनरबाजी करत भूमिका मांडणार आहे.. दरम्यान, मनसेच्या या बॅनरबाजीचा मजकूर एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय.हे काय करणार मराठीची सक्ती, हे तर करत आहेत परप्रांतीयांची भक्ती आता मनसेच उतरवणार यांची मस्ती.. असा आशय या बॅनर्सवर लिहिण्यात आलाय.