दरम्यान साकीनाकामधील मृत्यूप्रकरणी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरलं जातंय. खुद्द उपमहापौर संजय घाडी यांनीच आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तर ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेंनीही ही मागणी केलीय.. दरम्यान भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी आम्ही कमी पडलो अशी कबुली देत पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिलंय.शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराविरोधात ट्विट केलंय... पालिकेच्या कारभारामुळे आणखी एक जणांचा बळी गेल्याचे त्यांनी म्हटलंय.