Dhule Viral Video| MLA अनुप अग्रवालांमुळे गोवंश हत्येचा गुन्हा दाखल नाही; पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

धुळे शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमुळे सध्या वाद निर्माण झालाय.. या व्हिडिओमध्ये संबंधित पत्रकाराने प्रशासनासह भाजपचे स्थानिक आमदार अनुप अग्रवाल यांचे विशेष आभार मानले आहेत... आमदार अनुप अग्रवाल यांच्या भूमिकेमुळे यंदाच्या बकरी ईदमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम समाजावर गोवंश हत्येप्रकरणी एकही गुन्हा दाखल झाला नाही आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेने अत्यंत योग्य नियोजन केलं, असा दावा करत या व्हिडिओतून आमदारांचे कौतुक करण्यात आलं.. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय

संबंधित व्हिडीओ