चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याला पाणी सोडल्यानंतर अवघ्या काही तासांत भगदाड पडलं. प्राथमिक अहवालानुसार ससे आणि उंदरांनी केलेल्या बिळांमुळे कालव्याची भिंत कमकुवत झाली होती. पाण्याचा दाब वाढल्यानंतर कालव्याला भगदाड पडून पाणी थेट शेतांमध्ये शिरल्याचं सांगितलं जात आहे. 2010 मध्ये बांधण्यात आलेला हा कालवा अनेक वर्षे वापरात नसल्याने मोठ्या प्रमाणात बिळं निर्माण झाली होती, असा दावा सिंचन विभागाने केला आहे. सध्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून दोन दिवसांत कालवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.. यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.