G.D.Madgulkar यांच्या घरावरून कुटुंबीयांमध्ये वाद; माडगूळकरांच्या घराचा वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत

मराठी साहित्यातील ज्येष्ठ प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेता ग दि माडगूळकर यांचं घर पाडण्यासाठी डाव आखला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ग दि माडगूळकर यांची 'पंचवटी' पाडण्यास त्यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी विरोध केला आहे. जवळच्या नातेवाईकांकडून त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप सुमित्र यांनी केलाय. दरम्यान आता हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलाय. सुमित्र माडगूळकर आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता माडगूळकर यांनी खडकी पोलिसात तक्रार केलीय..

संबंधित व्हिडीओ