पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एका ३२ वर्षीय महिलेची लग्नाचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने मार्च २०२५ मध्ये एका प्रसिद्ध मॅट्रिमोनी वेबसाईटवर आपली नोंदणी केली होती. यादरम्यान तिची ओळख गोरक्षनाथ गावडकर नावाच्या व्यक्तीशी झाली. या आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आपल्याला पैशांची खूप अडचण असल्याचे सांगून तिच्याकडून वेळोवेळी 21 लाख रोख घेतले.