Mumbai महापौरांच्या वॉर्डात पांढऱ्या पट्ट्यांचा वाद, MNS कडून मुंबई पालिकेला 48 तासांचा अल्टिमेटम

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वॉर्डातील फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून आता मनसे आक्रमक झालीय.. फुटपाथचे विद्रूपीकरण झाल्याचा आरोप करत मनसेने महापालिकेला ४८ तासांचा अल्टिमेटम दिलाय. गेल्या दीड महिन्यापासून पाठपुरावा करूनही महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप मनसेने केलाय. हे पट्टे तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा मुंबईतील मनसे पदाधिकारी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा विभाग अध्यक्ष संदीप कुलथे यांनी दिलाय. यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.

संबंधित व्हिडीओ