पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय, पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ करण्यात आलीय. पण सर्वसामान्यांच्या बजेटवर मात्र याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने कऱण्यात आलाय.. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार नसल्याचं स्पष्ट केलंय.