भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये झुडपात बसलेल्या वाघासोबत सेल्फी काढण्याचा जीवघेणा प्रकार समोर आला. काही अति उत्साही नागरिकांनी वाघासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केलाय. तर काहींनी त्याच्यासोबत व्हिडिओ देखील काढलेत आणि हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लाखांदूरच्या हरतोली तई गावातला हा सगळा प्रकार आहे.