नंदुरबारच्या नवापूरमध्ये काल रात्रीपासून भूकंपाचे धक्के जाणवू लागलेत. मोठा कडवण आणि खोकसा या परिसरात दोन दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवलेत. भूगर्भातूनही आवाज येतोय त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे.