आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार आणि पदाधिकाऱ्यांना कडक ताकीद दिली आहे. कोणीही आपला मतदारसंघ सोडून न जाण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे काम असल्यास मध्यवर्ती कार्यालयाला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिंदेंच्या या आदेशामागे कोणते कारण आहे?