मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे... यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात येत आहेत.. दादर पश्चिम व दादर पुर्व यांना जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद केल्यामुळे सदरची वाहने ही पुर्णतः टिळक ब्रिज व करी रोड ब्रिज कडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे दादर वाहतूक विभागातील भवानी शंकर मार्ग व एस. के. बोले मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत आहे. याकरीता वाहतूक प्रवाह सुरळीत राखण्याच्या उद्देशाने सदर रस्त्यांवरील वाहतूक बदल करण्यात आले आहेत.