मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय... जरांगे यांनी आरक्षणासाठी आरपारच्या लढाईची घोषणा केलीय.. यावेळचं उपोषण अत्यंत कठोर होणार आहे.. 30 तारखेला उपोषण सुरू होईल. मंडप टाकणार नाही.. सावलीत बसणार नाही. थेट रणरणत्या उन्हात बसणार आहे. मी उष्माघाताने मेलो तर त्याला सरकारच जबाबदार असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशाराच जरांगे यांनी दिलाय.सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, असा दमच त्यांनी दिलाय.त्याचबरोबर समाज बांधवांनी अंतरवालीत येऊ नये, असं आवाहनही जरांगेंनी केलंय..